केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा शिवसेनेचे अकलूज पोलिसांना निवेदन
भूमीपुत्र न्यूज
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना सार्वजनिक कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केले त्या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) माळशिरस तालुक्याच्या वतीने निषेध करीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे माळशिरस तालुकाप्रमुख संतोष राऊत यांच्या नेतृत्वाखाली अकलूज पोलिसांना दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सत्तेच्या आहारी जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचे विषयी अत्यंत खालच्या भाषेत टिका केली,त्यामुळे समस्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना माळशिरस तालुका यांचेवतीने अमित शहा यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी अकलूज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राऊत, तालुका उपप्रमुख महादेव बंडगर, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका उमेश जाधव,शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे, युवासेना शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे , बागेवाडी ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे, कांग्रेस शहर अध्यक्ष नवनाथ साठे ,लक्ष्मण डोईफोडे यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.