महाराष्ट्रमाळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

डॉ सर्जेराव दोलतडे यांना राष्ट्रपती भवनातून 26 जानेवारीच्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण

मा आ. राम सातपुते यांच्याकडून दोलतडे यांचे अभिनंदन

भूमीपुत्र न्यूज

डॉ. सर्जेराव दोलतडे यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विशेष निमंत्रित केले आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रपती त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणुन 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला बोलवून गौरव करतात. या वर्षी प्रिन्सिपल सायंटिफिक Advisory कमिटी, भारत सरकार यांच्याकडून तरुण शास्त्रज्ञ डॉ सर्जेराव बापू दोलतडे यांचे नाव राष्ट्रपतींना Recommend करण्यात आले होते.

डॉ दोलतडे यांनी गहाण पाणी शुद्ध करण्याची नवीन टेक्नॉलॉजी शोधून ती भारतातील ४ राज्यात (महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश) यशस्वीपणे बसवली आहे. तसेच आतापर्यंतचे आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी संशोधनामध्ये घातले आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांनी दोनवेळा भारत देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर केले असून सध्याचा त्यांचा सन्मान हा अजून ऊर्जा देणारा आहे असे डॉ सर्जेराव मानतात. त्यांचा हा एकुण प्रवास ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा दायक आहे.


त्यांच्या या सन्मानाबद्दल मा. आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!