कृषीमहाराष्ट्रमाळशिरस तालुका

सहकार महर्षि कारखान्याच्या ४ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे व २ कोटी २५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न

भूमीपुत्र न्यूज

अकलूज (शंकरनगर ) येथील स. म. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२०२३ च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ४ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक सतीश बाळकृष्ण शेंडगे यांचे हस्ते तसेच बगॅसवर आधारीत ३३ मे.वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आत्तापर्यंत एक्स्पोर्ट (विक्री) केलेल्या २ कोटी २५ लाख वीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक लक्ष्मण शंकर शिंदे यांचे हस्ते संपन्न झाले.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना वाटचाल करीत आहे.

कारखान्याचा सिझन २०२२-२०२३ चा ऊस गळीत हंगाम दिनांक २४/१०/२०२२ रोजी सुरु झाला असून दि. १८/१२/२०२२ अखेर ४ लाख ५० हजार ८६७ मे.टन ऊसाचे गाळप होऊन ४ लाख ०९ हजार ६०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा ९.४९ % व आजचा साखर उतारा १०.६६ % आहे. सध्या प्रति दिवस ८,५०० मे. टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे.चालू सिझन २०२२ २०२३ मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक २४/१०/२०२२ रोजी सुरु झाला असून दि. १८ / १२ / २०२२ अखेर त्यामध्ये वीज ३ कोटी ७३ लाख २५ हजार ४०४ युनीट निर्माण झाली असून त्यामधुन वीज विक्री २ कोटी २६ लाख ३१ हजार ८४१ युनिट केलेली आहे.तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि. १८/१२/२०२२ अखेर बी हेवी पासून रेक्टीफाईड स्पिरीटचे ५८ लाख १९ हजार १९१ लिटर्स तसेच इथेनॉलचे ५० लाख ६९ हजार ४९७ लिटर्स उत्पादन झाले आहे. अॅसेटिक अॅसिड विभागाकडे ३४३.९०० मे.टन अॅसिटाल्डीहाईड व ४२.००० मे.टन अॅसिटीक अॅसिडची निर्मिती झाली आहे. अशी माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अभयसिंह माने- देशमुख यांनी दिली.

साखर पोती वीज युनिट पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील,तसेच संचालक नामदेव ठवरे,धनंजय चव्हाण,शंकरराव माने-देशमुख,रावसाहेब मगर,मिलींद कुलकर्णी,राजेंद्र मोहिते,चांगदेव घोगरे,सौ.माधुरी लोंढे,भारत फुले,मोहित इनामदार व माजी व्हाईस चेअरमन रामचंद्रराव सावंत-पाटील,माजी संचालक सुभाष पताळे,केशव ताटे,पांडूरंग कदम,शिवाजीराव सिद,सुनिल एकतपुरे तसेच इतर मान्यवर धनंजय दुपडे,अनिलराव कोकाटे,रामचंद्र ठवरे,अमरसिंह माने-देशमुख,नामदेव चव्हाण,रणजित रणनवरे खातेप्रमुख,कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!