अकलूज येथे दिव्यांगांसाठी मोफत दिव्यांग साहित्य वाटप, रक्तदान शिबिर व फुफुस रोग तपासणी शिबिर
भूमीपुत्र न्यूज
दिव्यांग अनाथ व सामाजिक बहुउद्देशीय संस्था यशवंतनगर संचलित व हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे अनाथ दिव्यांग आश्रम खुडूस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनाचे औचित साधून जिल्हास्तरीय दिव्यांग सोहळा सोमवार दि 19 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वा कांतीलाल सांस्कृतिक भवन यशवंतनगर रोड, अकलूज येथे संपन्न होणार असल्याची माहिती विजय कुलकर्णी व प्रदीप खंडागळे यांनी दिली.
या दिव्यांग दिन सोहळ्यामध्ये दिव्यांगासाठी मोफत साहित्य वाटप ,मोफत फुफ्फुस रोग तपासणी, मोफत फुफ्फुस रोगावर तज्ज्ञांचा सल्ला आणि औषधोपचार होणार आहे याचबरोबर दिव्यांग वधू वर नाव नोंदणी कार्यक्रमही संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, समाज कल्याण अधिकारी सुनील कमिठकर ,प्रांताधिकारी ज्योती कदम , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे ,तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, डॉ. चिराग व्होरा उपस्थित राहणार आहेत . तरी सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे