नर्सिंग अभ्यासक्रम ए एन एम व जी एन एम प्रवेशासाठी व्हीजीएनटी ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
महाडिबीटी प्रणालीवर मॅपिंग करण्यास राज्य शासनाची मान्यता
भूमीपुत्र न्यूज
ओबीसी, एनटी, एसबीसी प्रवर्गातील नर्सिंग अभ्यासक्रमाला म्हणजे ए एन एम व जीएनएम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृृत्ती मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे़ सामाजिक न्याय विभागांमार्फत महाडिबीटी प्रणालीवर मॅपिंग झालेले अभ्यासक्रम विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गास लागू असणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेस महाडिबीटी प्रणालीवर मॅपिंग करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून इतर मागास बहुजन कल्याण विभाग हा वेगळा विभाग नव्याने निर्माण झाला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या बहुतांश योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती भटक्या जाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येतात. परंतु, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अनुज्ञेय अभ्यासक्रमांचे मॅपिंग केले नसल्याने या प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत होते.
सामाजिक न्याय विभागाप्रमाणे मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अभ्यासक्रम मॅपिंग होण्याकरिता विविध स्तरावरून मागणी होत होती. याच अनुषंगाने काही न्यायालयीन प्रकरणे देखील उद्भवली होती. याच पार्श्वभूमीवर इतर मागास बहुजन कल्याण संचालन संचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीने सामाजिक न्याय विभागामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीकरिता मॅप झालेल्या झालेले अभ्यासक्रम हे इतर मागास बहुजन कल्याण विभागांतील इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या योजनासाठी महाडीबीटी प्रणालीवर मॅचिंग करण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाप्रमाणेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अभ्यासक्रमांचे मॅपिंग करण्याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सहमतीसाठी सादर करण्यात आला. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडेही शिष्यवृत्ती देण्याबाबत याबाबत विचारणा केली गेली होती त्याला वैद्यकीय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे इ.मा.ब.क विभागाने विभाग स्तरावर उचित निर्णय घ्यावा असे अभिप्राय प्राप्त झाला होता.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी खासगी नर्सिंग स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, राज्याचे समन्वयक डॉ राहुल जवंजाळ सचिव शकंरराव आडसुळ खजिनदार विनोद गायकवाड तसेच राज्यातील असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सचिन देसाई राष्ट्रपाल वैद्य किशोर चौधरी जयंत नायकुडे तसेच नर्सिंग कौन्सिल चे अध्यक्ष मा डॉ रामलिंग माळी नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील असोसिएशनचे ॲड चंद्रकांत जाधव यांनी वेळोवेळी शासनस्तरावर लक्षवेधी पत्रव्यवहार व बैठका घेऊन पाठपुरावा केला व त्यास यश मिळाले आहे यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.