कोळेगांव येथे स्वतंत्र तलाठी नेमण्याची गरज;शेतकऱ्यांची होतेय गैरसोय
भूमीपुत्र न्यूज
कोळेगांव ता माळशिरस येथे तलाठी कार्यालयासाठी पूर्णवेळ व स्वतंत्र गांव कामगार तलाठी यांची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.गांव कामगार तलाठी हे महसूल प्रशासनाचा मुख्य भाग असतो.शेतकऱ्यांना 7/12,8अ, उतारे,खरेदी विक्री च्या नोंदी लावण्याची तलाठी कार्यालयात जाऊन काम करून घ्यावे लागते.ही कामे आता ऑनलाईन झाल्याने बऱ्याच वेळा सर्वर डाऊन असल्याने कामे प्रलंबित राहतात त्यामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे.त्यातच एका तलाठी यांच्याकडे 2,3 अतिरिक्त गावाचा भार असल्याने त्या सर्वच गावातील ,नागरिक शालेय विद्यार्थी यांना रहिवासी दाखले,उतारे वेळेत मिळू शकत नाहीत.
शासकीय कर्मचारी यांनी नेमणूक असलेल्या ठिकाणी मुक्कामी राहावे असा शासन निर्णय आहे.परंतु या निर्णयास केराची टोपली दाखवत हे कर्मचारी कामाच्या ठिकाणी मुक्कामी राहत नसून शासनाची फसवणूक करीत असल्याने अश्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
त्यामुळे कोळेगांव येथे स्वतंत्र तलाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कोळेगांव येथील गाव कामगार तलाठी हे कोळेगांव येथे ठराविक दिवशी येणे गरजेचे असतानाही कोळेगांव येथे न येता तालुक्याच्या ठिकाणी ज्यांना गरज आहे अशा लोकांना बोलवून त्या ठिकाणीच उतारे व इतर कागदपत्रे देवाण-घेवाण करतात परंतु ज्यांच्याकडे दळणवळणाची साधने आहेत अशा लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे योग्य आहे परंतु गोरगरीब जनतेला जाणीवपूर्वक कोळेगांव येथील गाव कामगार तलाठी यांच्याकडून त्रास होत आहे अशा या गाव कामगार तलाठी यांच्यावर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे .