माळशिरस तालुका

अकलूज अध्यापक विद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.सौ.अरूणादेवी देसाई अध्यापक विद्यालयातील साल २००९-१० वर्षातील माजी छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिकांचा स्नेहमेळावा रविवारी दि २१ रोजी माळेवाडी अकलूज येथे उत्साहात पार पडला .

दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा येथील माजी छात्र अध्यापक यांनी विद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच या तुकडीतील सध्या जिल्हा परिषद नियुक्त , शासकीय विभागांमध्ये सेवा बजावणारे , व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी यांचा गुणगौरव करण्यात आला .

कार्यक्रमासाठी माजी छात्र अध्यापक जुल्कर शेख यांनी सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक म्हणून गोपाळ लावंड , सोनाली जगताप , गोविंद पवार , प्रदीप मिसाळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश करडे यांनी तर आभार संदीप थोरात यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!