महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

अकलूज येथे 16 एप्रिल ते 1 मे पर्यंत डान्स वर्कशॉप सुरू

भूमीपुत्र न्यूज

साई सहारा मेडिकल हेल्थ अँड एज्युकेशनल अकॅडमी अकलूज व कलामूर्ती डान्स अकॅडमी अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे 16 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत स्टेप अप डान्स वर्कशॉप वोल्युम 4 सुरू असून सलग 16 दिवस चालणाऱ्या या वर्कशॉप मध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकाच्या सोयीनुसार व बॅचेसनुसार हे वर्कशॉप सुरू असल्याची माहिती निर्माते व नृत्यदिग्दर्शक प्रताप थोरात व मनोज जगताप यांनी भूमीपुत्र न्यूज सी बोलताना दिली.

हे डान्स वर्कशॉप अकलूज येथील सहारा इन्स्टिट्यूट ,पंढरपूर रोड अकलूज ता. माळशिरस ,जि सोलापूर या ठिकाणी सुरू झाले असून या वर्कशॉप मध्ये भारत की शान लेटेस् डान्स उपविजेता विशाल पवार पुणे (क्रम आणि बी बॉइंग), मराठी मुव्हीज अँड अल्बम चे कोरिओग्राफर सुनील अवचिते पुणे ,(बॉलीवूड अँड वेस्टर्न), ड्रीम डान्स स्टुडिओ पुणेचे निखिल कसबे (हिप हॉप ),रियालिटी शो डी जोडी सुशील गायकवाड, बीड (अर्बन) ईशा आढाव ,पुणे (ओपन कोरीओ) ,मानसी मांगले बी-बॉइंग गर्ल ,पंढरपूर कंटेम्पररी, पूजा क्षीरसागर पंढरपूर ,भरतनाट्यम विशारद (सेमी क्लासिकल )हे मार्गदर्शन करणार आहेत.

इच्छुकांनी प्रताप थोरात सर 96 65 31 58 21 व मनोज जगताप 830 818 34 83 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा प्रवेश फी बेसिक बॅच फी 800 रुपये, ॲडव्हान्स बॅच 1000 रुपये, स्पेशल लेडीज बॅच 1000 रुपये, वर्कशॉपच्या शेवटच्या दिवशी डान्स शो व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!