माळशिरस तालुकासामाजिक

महिला दिनानिमित्त महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांचा अकलूज येथे सन्मान

भूमीपुत्र न्यूज

जागतिक महिला दिनानिमित्त महावितरणच्या अकलूज उपविभागीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व महिला भगिनींचा उपकार्यकारी अभियंता डी बी ओमासे यांच्या हस्ते पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्याही पुढे जाऊन सध्या महिला सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना दिसत आहे यास ऊर्जा, विद्युत पुरवठा क्षेत्रही मागे कसे राहील याच पार्श्वभूमीवर विद्युत विभागातही महिला कर्मचारी मोठ्या ताकतीने व दिमाखात उभे राहून कार्य करीत आहेत अशा महिला भगिनींचा जागतिक महिला दिनानिमित्त महावितरण विभागामार्फत सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रीमती असीफा पठाण, राजमल अण्णादुराई ,राजश्री खरात अनुश्री सोढळ ,अर्चना मनुरे,स्वाती जाधव, ज्योती काकडे,शुभांगी कांबळे या महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय ओमासे,उपव्यवस्थापक सुरेश वसेकर,दत्तात्रय यादव, महेश कांबळे,रोहित रसाळे,समीर शेख, हेमंत पवार,आनंद माळी,सत्यावन कांबळे व विभागीय सचिव बंडु कोळी उपस्थित होते.

तर वेळापूर उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता अजय बोधे,सहाय्यक अभियंता भाऊसाहेब मोटे यांच्या हस्ते शाल व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.


सहाय्यक अभियंता चैताली सागर,लिपिक निशा वळवी,सुचिता साळवी,प्रधान तंत्रज्ञ मंगल कंड्रे,विद्युत सहाय्यक शिला खाडविलकर,अपेक्षा चौधरी या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला.

याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता अजय बोधे, सहाय्यक अभियंता भाऊसाहेब मोटे,संतोष सूळ,गोपाळ कदम,उपव्यवस्थापक सुरेश वसेकर, संजय माळी, नितिन वाघे,विभागीय सचिव बंडु कोळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!