शिवप्रसाद ग्रुपच्या विविध प्रकल्पांचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार

भूमीपुत्र न्यूज
‘शिवप्रसाद ग्रुप’च्या अंतर्गत विविध नवीन व्यावसायिक प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा येत्या गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत थाटामाटात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्यात एसपीजी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नातेपुते (कळंबोली शाखा) शिवप्रसाद डेअरी प्रोडक्टस् & आईस्क्रीम शिवप्रसाद डेव्हलपर्स शुभारंभ करण्यात येणार आहे.हा सोहळा श्रीमती राजश्री जगन्नाथ मोरे आणि शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष शरदबापू मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

तसेच, या कार्यक्रमास शिवप्रसाद उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रमेशआप्पा मोरे, नमो: ईटेबल्स प्रा.लि.चे डायरेक्टर वैभव मोरे, शिवप्रसाद कॅटल फींड्स प्रा.लि.चे डायरेक्टर चि. तेजस (दादा) मोरे, शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमन व सोलापूरच्या मा. जि.प. सदस्या सौ. ऋतुजाताई शरद मोरे, एस पी जी मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ. अश्विनीताई रमेश मोरे, एस पी जी इन्शुअन्स प्रा.लि.च्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. प्रियंकाताई वैभव मोरे, शिवप्रसाद प्रमोटर्स ॲंड डेव्हलपर्स प्रा.लि.चे चि. प्रथमेश (दादा) मोरे आणि शिवप्रसाद डेली नीड्स प्रा.लि.चे चि. प्रतीक (भैय्या) मोरे हे विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




