माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

डीसीसी बँक फिरता चषक ,सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्याने पटकाविला

भूमीपुत्र न्यूज

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक जिल्हा कर्मचारी वेल्फेअर ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना बँक डेव्हलपमेंट प्लॅन दिलेला होता. यामध्ये माळशिरस तालुक्याने 2021 /22 व 2022 /23 आणि 2023/ 24 वर्षांमध्ये बँकेने ठेवलेले जिल्हा पातळीवरील एक नंबरचे बक्षीस व फिरता चषक माळशिरस तालुक्याने मिळवला होता. त्याचप्रमाणे 2024 /25 मध्येही तो चषक कायम ठेवत माळशिरस तालुक्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

सोलापूर डी.सी.सी.बँक.तालुका माळशिरस उत्कृष्ट कामकाज जिल्ह्यात 1 नंबर वसुली व बँकेने दिलेली टार्गेट पूर्ण करून एक नंबरचे जिल्ह्यातील बक्षीस मिळवले आहे.बँकेचे कुशल प्रशासक कुंदन भोळे ,बँकेचे सिईओ शिंदे, व्यवस्थापक देशपांडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फिरता चषक व सन्मानपत्र देऊन तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक ,बँकेचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख,पालक अधिकारी, जिल्ह्यातील सिनियर बँक इन्स्पेक्टर ,बँक इन्स्पेक्टर, शाखाधिकारी,व जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माळशिरस तालुका सिनियर बँक इन्स्पेक्टर एम बी थोरात यांना गौरवण्यात आले.जिल्हा बँकेतील माळशिरस तालुक्याचे स्थान कायम ठेवत सलग चौथ्या वर्षी ही तालुक्याने कमकाजा बाबतीत हॅट्रिक केली आहे हे श्रेय तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे आहे असे यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!