जीवन जानकर व ज्योती जानकर यांच्या जातीच्या दाखल्याची चौकशी करून कारवाई करा /16 फेब्रुवारी रोजी जन आक्रोश मोर्चा
भूमीपुत्र न्यूज
अनुसूचित जाती जमातीत सध्या होत असलेली घुसखोरी व इतर हक्कांच्या मागण्यासाठी गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वा अनुसूचित जाती जमाती बचाव समिती ,माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूजच्या प्रांत अधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती बचाव समितीच्या वतीने देण्यात आली .
अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार असून या ठिकाणाहून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालय अकलूज या ठिकाणी जाणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून ज्या प्रमुख मागण्या करण्यात आलेले आहेत यामध्ये जीवन जानकर व ज्योती जानकर यांनी हिंदू धनगर ही मूळ जात असताना अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक या जातीमध्ये घुसखोरी करून बनावट कागदपत्रे काढून जातीचा दाखला काढला आहे याची चौकशी करून कारवाई करावी, उत्तम जानकर, ज्योती जानकर व जीवन जानकर यांनी खोटा जातीचा बनावट दाखला वापरून आत्तापर्यंत शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे का ? याची चौकशी करावी, जीवन जानकर व ज्योती जानकर यांना बनावट कागदपत्राच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन तहसीलदार यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी, माळशिरस तालुक्यात असणाऱ्या अनुसूचित जाती जमातींना विविध शासकीय समितीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या बेघरांना शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशा आशयाच्या मागण्यांचे परिपत्रक तयार करून या परिपत्रकाचे संपूर्ण तालुकाभर प्रकाशित करण्यात येत आहे .
या जन आक्रोश मोर्चासाठी अनुसूचित जाती जमाती बचाव समितीचे लालासाहेब अडगळे, संदीप खंडागळे, सज्जन लोखंडे ,सुधीर साठे, दीपक खंडागळे ,सागर लोखंडे आदी परिश्रम घेत आहेत .
सर्वोच्च न्यायालयाने आमचा जातीचा दाखला ग्राह्य धरला आहे उत्तम जानकर आणि कुटुंबीयांनी नेहमीच जनतेच्या हिताचा विचार केला आहे आमच्याकडे दाखला असतानाही आमच्या कुटुंबीयांचा विचार न करता सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे या हेतूने वेळापूरला रजनीश बनसोडे व धानोरे या ठिकाणी बापू नाईक नवरे यांना सरपंच केले आहे हा मोर्चा अनुसूचित जाती जमातीचा नसून मोहीते यांच्या सांगण्यावरून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
उत्तमराव जानकर-मा.चेअरमन शेतकरी साखर कारखाना, चांदापुरी