चांदापूरी येथील सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यु. कॉलेजला ॲड धनंजय बाबर यांनी स्वतंत्र्यदिनानिमित्त दिली सत्तर हजार रुपयांची देणगी, प्रशालेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
भूमीपुत्र न्यूज / रशीद शेख ,चांदापुरी
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी (ता.माळशिरस सोलापूर) येथे उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी ॲड धनंजय बाबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.विद्यार्थ्यांनी चांदापुरी गावातुन रॅली काढले उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मुले व मुली यांनी देशभक्तीपर गीते,भाषणे व भारत माता की जय म्हणून परिसर दुमदुमून सोडला होता.वर्षाराणी जाडकर,मिसाळ,अक्षरा लोंढे,प्रेरणा देठे,अमृता तुपे आदीनी उत्कृष्ट भाषणे केली.
यावेळी दहावी ब बारावी (आर्ट,सायन्स, कॉमर्स) 2022-23 मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ,NMMS विद्यार्थी व शासकीय विद्या महाविद्यालयात प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड धनंजय बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर प्रशालेस 70000/- रु देणगी दिल्याने ॲड बाबर यांचा विशेष सत्कार गारवाड विकास सोसायटीचे संचालक आनंदा लोंढे व जितेंद्र देठे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,प्राचार्य के साठे,विशेष अतिथी बाळासो गायकवाड( ता.अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) ,शाळा समिती सभापती बाळासो जाडकर,शाळा समिती अध्यक्ष कांबळे आदीनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे,युवा उद्योजक भैय्या बाबर,जितेंद्र देठे,लक्ष्मण साठे,अशोक मारकड,शिंदे,बापू सुळ,समाधान खरात,अंकुश लोंढे,रणजित सरतापे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा.अल्ताफ पठाण,प्रा.कारंडे,प्रा.देवकाते, श्रीमती काळे ,अरुणा लोंढे इ आदींनी विशेष परिश्रम घेतले.प्रास्तविक प्राचार्य के साठे ,सूत्रसंचालन प्रा.राजेश वायदंडे यांनी तर आभार आकाश सरतापे यांनी मानले.