कॅन्सरवरील लस पिंक रेवोल्युशन च्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात मिळणार मोफत
भूमीपुत्र न्यूज
पिंक रेवोल्युशन ,अपोलो हॉस्पिटल मुंबई आणि कॅन्सर पेटंट अँड असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 20 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाइकल कॅन्सर वरील लस मोफत देणार आहे अशी माहिती पिंक रेवोल्युशन च्या सहसंस्थापिका डॉ श्रद्धा जवंजाळ यांनी अकलूज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी या पत्रकार परिषदेला सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार ,स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतीश दोशी, डॉ मानसी देवडीकर उपस्थित होत्या.
महिलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता जनजागृती होणे गरजेचे आहे पिंक रेवोल्युशन च्या माध्यमातून सर्वाइकल कॅन्सरवर दिली जाणारी मोफत लस हे कौतुकास्पद आहे याचा लाभ मुलींनी घ्यावा असे मत यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार यांनी सांगितले तर स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतीश दोशी यांनी सांगितले की 9 वर्ष ते 20 वर्षाच्या आतील मुलींना गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो यासाठी एच पी व्ही नावाची लस घेणे गरजेचे आहे खाजगीमध्ये या लस ची किंमत 4 हजारापर्यंत इतकी आहे परंतु ही लस महाग असल्याने सर्वांना घेता येत नाही परंतु या पिंक रेवोल्युशन ,अपोलो हॉस्पिटल आणि कॅन्सर पेटंट अँड असोसिएशनच्या वतीने या लसीचे तीन डोस मोफत देण्यात येणार आहेत.
स्त्री रोग तज्ञ डॉ. मानसी देवडीकर यांनी सांगितले की, एच पी व्ही नावाची कॅन्सरवरील लस ज्यावेळी मुलींना देण्यात येते त्यावेळी त्यांना गर्भाशयाच्या पिशवीचा मुखाचा कॅन्सर ,खालच्या अंगाचा कॅन्सर, मायांगाचा कॅन्सर व गुदद्वाराचा कॅन्सर आशा 4 कॅन्सर वर ही लस प्रभावी असून या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 1 महिन्यांनी दुसरा डोस व 6 महिन्यांनी तिसरा डोस असे 3 डोस घेणे गरजेचे आहे यामुळे या कॅन्सरला अटकाव होतो . पिंक रेवोल्युशन ही सामाजिक संस्था सातारा येथील जयश्री शेलार यांनी स्थापन केली असून अकलूज येथील डॉ. श्रद्धा जवंजाळ या त्याच्या सहसंस्थापिका आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून साडेतीन लाख महिला यामध्ये सहभागी आहेत पत्रकार परिषदेस उपस्थित असणाऱ्या डॉ. एम के इनामदार ,डॉ. सतीश दोशी व डॉ. मानसी देवडीकर यांचा सन्मान डॉ. राहुल जवंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
पिंक रिव्होल्यूशन ,अपोलो हॉस्पिटल मुंबई आणि कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन इंडिया या तीनही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर ही लस मोफत देण्यात येत आहे याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यात या लसीचे मोफत वितरण केले जाणार आहे यासाठी अकलूज येथे डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्याकडे यासाठी नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केलेल्या मुलींनाच या लसीचे तीनही डोस मोफत देण्यात येणार आहेत वय वर्ष 18 च्या आतील मुलींना पालकांचे संमती पत्र आवश्यक आहे .