आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लवंगच्या फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली राष्ट्रीय एकात्मता
भूमीपुत्र न्यूज / केदार लोहकरे
लवंग (ता.माळशिरस) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभुषेत तर याच दिवशी बकरी ईद असल्याने काही विद्यार्थ्यांनी आपला पारंपारिक पेहराव परिधान करून एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत होते.यामुळे या शाळेतील मुलांनी समाजापुढे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
गुरुवार दि 29 जून रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन सण एकाच दिवशी येत असल्यामुळे या शाळेतील मुलांनी दिंडी व पालखी सोहळा साजरा करत बकरी ईदच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्याचा संदेश देत. बाळगोपाळांनी आनंदात दोन्ही सण साजरे केले लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिक सौ.नूरजहाॅ फक्रुउद्दीन शेख या नेहमी शाळेत विविध सण समारंभ कार्यक्रमांचे आयोजन करत असतात त्यामुळे मुलांना लहान वयातच सर्व सण समारंभ साजरा करण्या मागचा हेतू लक्षात येतो या शाळेत मुलांना सर्व धर्म समभावची शिकवण ही दिली जाते.
यावेळी विद्यार्थींच्या गळ्यात तुळशीची माळ,हातात टाळ,मस्तकी टिळा,पांढरे धोतर ,शर्ट परिधान करून तर मुली साड्या नेसून डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण करीत हे छोटे वारकारी आपल्या संस्कृतीची जपणूक करीत होते तर बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर हे छोटे वारकरी मुस्लिम विद्यार्थ्यांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.या बाल दिंडीत मुस्लिम पोशाखातील विद्यार्थी वारकऱ्यांसमवेत चालत असताना अल्लाहकडे वारकऱ्यांसाठी प्रार्थना करीत होते.या सर्व वारकऱ्यांना दशरथ दगडे यांनी खाऊ वाटप केला रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या दिंडीतील वेगळेपण पाहून राष्ट्रीय एकात्मता हिच आहे.हम सब एक है चाहे वेशभूषा अलग है…असे उदगार उपस्थित नागरिकांकडून ऐकायला मिळत होते .या बाल दिंडीत पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख,गुलशन शेख तसेच दशरथ दगडे,समाधान जगताप, भिमराव शिंदे,शाहीन कोरबू,अस्ल्म काझी,वैशाली उघाडे यांनी परिश्रम घेतले.