आ. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमीत्त चांदापुरी येथे मोफत आरोग्य तपासणी व रेशनकार्ड शिबीर संपन्न
भूमीपुत्र न्यूज / रशिद शेख ,चांदापुरी
आ.राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमीत्त चांदापुरी ता माळशिरस येथे शनिवार दिनांक 11 मार्च रोजी मोफत सर्वरोग निदान शिबीर , रेशनकार्ड शिबीर व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन चांदापुरी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते . या शिबीराचे उदघाटन संस्क्रृती राम सातपुते यांच्या हस्ते संपन्न झाले या शिबिरात 100 रुग्णांची आरोग्य तपासणी नेत्र तपासणी करण्यात आली तर जवळपास 150 लाभार्थ्यांनी रेशनकार्ड शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी सरपंच जयवंत सुळ , उपसरपंच तात्यासो चोरमले , जेष्ठनेते लिंगा पाटील , विजय पाटील ,पुरवठा अधिकारी लोखंडे, केमकर प्राथमिक आरोग्य केंद्र माणकीचे वैद्यकिय अधिकारी डॉ भोसले ,डॉ श्रीमती शेख , खताळ ,मगर श्रीमती साळवे ,धाईंजे ,अक्षय जाधव ,कांबळे , गुजरे ,गोळे,लवटे ,दणाणे सिस्टर ,भोसले सिस्टर ,लॅब टेक्निशियन सागर माने देशमुख ,डॉ.शरद शिर्के , संतोष शेट्टी ,थोरात ,पुणेकर , तेजश्री माने आदी मान्यवर उपस्थित होते
आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे शिबीराचे आयोजन चांदापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरासाठी शाहिद शेख , प्रमोद मगर , नाथा सरक , नागराज मिसाळ , रमेश सुळ व पत्रकार रशिद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले .