महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी भानुदास सालगुडे पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

भूमीपुत्र न्यूज

केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे पालखी महामार्ग पाहणी साठी माळशिरस तालुक्यात गुरुवार दि 14 मे रोजी आले असताMCCI चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते भानुदास सालगुडे पाटील यांनी नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजेच शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ निवेदन देऊन शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक जिल्ह्यांचा कायापालट होणार असून विशेषता माळशिरस तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे पत्र मंत्री महोदयांना दिले.

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ व विरोधात ठिकठिकाणी प्रदर्शने होत असताना भानुदास सालगुडे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ दिलेल्या निवेदनाची सर्वत्र चर्चा होत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक विकास पुरुष म्हणून संपूर्ण देशभर ओळखले जातात विकास करावयाचा असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार परंतु जमिनी जात असताना शेतकऱ्याचे पोट त्या जमिनीवर अवलंबून आहे त्या जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळावा असेही या निवेदनात नमूद केले आहे.

Oplus_16908288

त्याचबरोबर शक्तिपीठ द्रुतगती मार्गावर माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे इंटरचेंज मंजूर करणे,श्रीपूर येथे इंटरचेंज प्रस्तावित आहे परंतु अद्याप अधिसूचित नाही इंटरचेंज अधिसूचित करून निधी मंजूर करावा. यामुळे 140 एकर औद्योगिक जमीन थेट नागपूर-गोवा कॉरिडॉरला जोडली जाईल असेही नमूद करण्यात आले आहे.

शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 5 मे रोजी काढली असून 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांनी ग्राममहसूल अधिकाऱ्यांना बाधित क्षेत्राचे अवलोकन करण्यासाठी पत्रही काढले आहे यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या या महत्वकांक्षी प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध न करता सहकार्य करावे मात्र शासनाने शेतकऱ्याला जास्तीचा व योग्य मोबदला द्यावा.

भानुदास सालगुडे पाटील, MCCI अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!