कोळेगांव येथे महापुरुषांची संयुक्त जयंती व आरोग्य शिबिराचे आयोजन; उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विशाल बंदपट्टे यांची निवड

भूमीपुत्र न्यूज
शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंच कोळेगांव प्रणित, ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती उत्सव समिती’च्या वतीने यावर्षीचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कोळेगांव येथील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून, जयंतीच्या दिवशी भव्य आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विशाल बंदपट्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
इतर पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत:
उपाध्यक्ष: शाहरुखभाई मुलाणी,सचिव: गणेश धांडोरे, औदुंबर धांडोरे,सहसचिव: विजय पारसे, राहुल पारसेखजिनदार: लक्ष्मण बंडु पारसे, संतोष धांडोरे,संघटक: शुभम पारसे, उत्तम धांडोरे कार्याध्यक्ष: दिनेश पारसे, नाथा पारसे, लखन काटे उपकार्याध्यक्ष: अभी जाधव, भुषण वाघमारे प्रसिध्दी प्रमुख: सतिश पारसे मार्गदर्शक: प्रा. शहाजी पारसे सर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने, सकाळी ९:०० वाजता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.कोळेगांव व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने नूतन अध्यक्ष विशाल बंदपट्टे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




