मराठा सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम,
12 फूट लांबीचा गुलाब पुष्पहार, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन महिलांचा केला सन्मान
भूमीपुत्र न्यूज
जागतिक महिला दिनानिमित्त माळशिरस तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने माळशिरस पंचायत समितीतील डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सभागृहात आपल्या कार्यकर्तृत्वाने शासकीय सेवेत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा माळशिरसचे गट विकास अधिकारी विनायक गुळवे, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, तालुकाध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते, कार्याध्यक्ष निनाद पाटील, सचिव राजेंद्र मिसाळ, यांच्या हस्ते या महिलांना 12 फूट लांबीचा गुलाबाचा पुष्पहार ,शाल , फेटा, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनीषा खांडे -जाधव या आरोग्य परिचारकेस नुकताच महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते त्यांना यावेळी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन जिजाऊरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले तर ग्रामसेविका भारती किसान कारंजकर , ग्रामसेविका ज्योत्स्ना मुरलीधर दीक्षित , शिक्षिका सुनीता विजय चव्हाण ,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सरिता भारत शेंडगे यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
कार्यक्रमासाठी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के एस बाबर, कृषी विभागाचे चव्हाण ,विस्तार अधिकारी व पंचायत समितीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी शिक्षिका सुनीता चव्हाण, मनीषा खांडे-जाधव ,कार्याध्यक्ष निनाद पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राजेंद्र मिसाळ तर आभार कार्याध्यक्ष निनाद पाटील यांनी मानले .
मराठा सेवा संघ हा समाजाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारी सामाजिक संघटना आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली जाते हे अभिमानास्पद आहे ज्याप्रमाणे शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिलांचा महिलादिनी सन्मान होतो याच पद्धतीने ज्या महिला भगिनी मग त्या ऊस तोडणी मजूर असू दे किंवा शेती आदी क्षेत्रांमध्ये खालच्या स्तरात काम करणाऱ्या महिला असो या महिलांचाही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून भविष्यात सन्मान व्हावा .
विनायक गुळवे ,गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस