शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन
युवासेनेचा स्तुत्य उपक्रम
भूमीपुत्र न्यूज
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी “ऐंशी टक्के समाजकारण विस टक्के राजकारण” हे ब्रीद वाक्य समोर ठेवून राजकारण केले. त्यामुळेच त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार, विचारानुसार वाटचाल करीत असताना, वाढते अपघात, व गरोदरपणात महिलांना लागणाऱ्या रक्ताची गरज पाहता सामाजिक बांधिलकीतून रक्तदाना सारखा पवित्र उपक्रम राबवून स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्य़ात एकाच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवासेनचे जिल्हा विस्तारक उत्तमजी आयवळे यांनी आवाहन केलेल्या या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी युवासेनेचे युवती सेनेचे जिल्हाप्रमुख ,तालुकाप्रमुख ,शहरप्रमुख यांनी कंबर कसली असून प्रत्येक तालुक्यात २३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ०५ या वेळेत हे रक्तदान शिबिर आयोजित केली आहेत. समाजातील कोणत्याही गरजूंना रक्त लागल्यास युवासेनेच्या वतिने रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
युवासेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बागल, महेश देशमुख, बालाजी चौगुले, गणेश इंगळे यांच्यावर विभागवार जबाबदारी दिली असून जास्तीत जास्त रक्तदान होण्यासाठी चारही जिल्हाप्रमुख प्रयत्नशील आहेत.
रक्तदान शिबिरा बरोबरच अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर, शालेय साहित्य वाटप, असे सामाजिक उपक्रम राबवून शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले जाणार आहेत. युवा सेनेच्या वतीने राबवले जाणाऱ्या या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्य़ात कौतुक होत आहे.