महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा
आ. राम सातपुते यांना मातृशोक;जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे निधन
भूमीपुत्र न्यूज
माळशिरसचे आमदार व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम विठ्ठल सातपुते यांच्या मातोश्री जिजाबाई विठ्ठल सातपुते वय वर्ष 74 यांचे अल्प आजाराने सोमवार दि 26 रोजी सायंकाळी निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे .
त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि 27 जून रोजी सकाळी 9 वा डोईठाण ता आष्टी जि बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या निधनाने सातपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुखातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो अशी माळशिरस तालुक्यातील अनेकांनी जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या निधनाने श्रद्धांजली वाहिली आहे