सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. राजीव राणे (कविटकर) यांच्या “संघर्ष” आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा शनिवार 4 फेब्रुवारी रोजी
भूमीपुत्र न्यूज
पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राजीव राणे (कविटकर) या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या जीवन प्रवासावर आधारित एक प्रेरणादायक “संघर्ष “या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वा कृष्णप्रिया हॉल, बायपास रोड ,अकलूज या ठिकाणी संपन्न होणार आहे.
लेखक प्रा. ताराचंद आवळे यांनी डॉ. राजीव राणे (कविटकर) यांच्या जीवनावरील “संघर्ष” नावाच्या आत्मचरित्राचे लेखन केले असून डॉ. राजीव राणे (कविटकर) यांनी आपल्या अथक परिश्रमाने आज पर्यंतच्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत खडतर परिश्रम व संघर्ष करून त्यावर यशस्वीरीत्या त्यांनी केलेली मात यावर या पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे .
या प्रभावी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी होत आहे डॉ. राजीव राणे (कविटकर) यांच्या जीवनावर आधारित असणारे संघर्ष नावाचे आत्मचरित्र अनेकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल .