निधन वार्तामाळशिरस तालुका
प्रकाश धायगुडे यांचे अल्पशा आजाराने निधन
भूमीपुत्र न्यूज
कुसमोड ता माळशिरस ,जि सोलापूर येथील सुपरिचित लेखापरीक्षक प्रकाश महादेव धायगुडे यांचे शुक्रवार दि 6 ऑक्टोबर 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 50 वर्षे इतके होते मनमिळावू व नेहमी हसत खेळत राहणारे प्रकाश धायगुडे यांच्या अचानक जाण्याने धायगुडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो ईश्वरचरणी प्रार्थना
प्रकाश धायगुडे यांच्या आकस्मित मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे त्यांच्या पार्थिवावर कुसमोड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे
भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे प्रकाश धायगुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐💐