माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

अंडरग्राउंड ब्रिज व ओव्हर ब्रिज झाल्याने निमगाव फाटा व खुडूस येथे बस थांबा असतानाही बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

राजकर्त्यांसह सामाजिक संघटनांनी लक्ष द्यावे

भूमीपुत्र न्यूज

निमगाव म. फाटा व खुडूस ता. माळशिरस ही दोन्ही गावे आळंदी-पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गालगत वसलेली गाव आहेत.या गावची लोकसंख्या 15 ते 20 हजार च्या दरम्यान आहे. निमगाव फाट्यालगत निमगाव, पिसेवाडी ,चांदापुरी, झिंजेवस्ती ,कुसमोड आदी गावांचे विद्यार्थी व नागरिक ये जा करीत असतात तर खुडूस गावामध्ये तरंगफळ ,झंजेवाडी ,डोंबाळवाडी- ,पानीव, विजयवाडी ,विझोरी,पिसेवाडी या गावातील नागरिक एसटी बसणे प्रवास करण्यासाठी खुडूस या ठिकाणी येत असतात. निमगाव फाटा व खुडूस येथील पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून निमगाव फाट्यालगत अंडरग्राउंड ब्रिज तर ख़ुडूस मध्ये उड्डाणपूल झाला आहे. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंनी सर्विस रोड चालू करण्यात आला आहे निमगाव फाटा व खडूस मध्ये सर्व बसचा थांबा असतानाही मुजोर बसचे चालक वाहक बस मात्र निमगाव फाटा येथे पुलाच्या खालून तर खडूस येथे उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने घेऊन जात आहे. त्यामुळे गावी येजा करणाऱ्यां प्रवाशांना तासान तास गावांमध्येच बसची वाट पहावी लागत आहे.

बसचे चालक- वाहक निमगाव फाटा व खुडूस ला बस थांबवत नाहीत. तसेच निमगाव फाटा व खुडूस मध्ये गाडी थांबणार नाही असे सांगून प्रवाशांशी हुज्जत घालत आहेत. मुख्य बस स्थानकावरती एसटीमध्ये बसताना निमगाव फाटा व खुडूस चे प्रवासी गाडी मध्ये बसू नये असे सांगत आहेत.त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची येण्या जाण्यासाठी गैरसोय होत आहे.

याबाबत खुडूस ग्रामस्थांनी आगारप्रमुख तसेच एस टी महामंडळाकडे लेखी तक्रारी दिली आहेत. तर इतरांनी भेटून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे तरीही मुजोर बस चालक – वाहक हे निमगाव फाटा व खुडूस मध्ये बस न थांबविता भरगाव वेगाने जात आहे. पुलाच्या खालच्या बाजूला व उड्डाण पुलावती प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही बसेस थांबवल्या जात नाहीत यामुळे प्रवाशांना भर उन्हामध्ये तासोंन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे यामुळे या भागातील नागरिक विद्यार्थी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

ज्येष्ठांना एसटी बस मधून मोफत प्रवास, महिलांना प्रवास करताना 50% सवलत, शालेय विद्यार्थ्यांना सवलत असे वेगवेगळे उपक्रम शासन एकीकडे राबवत असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली भले मोठे रस्ते होत असतानाही एसटी महामंडळाच्या मुजोर चालक, वाहक व अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे एरवी जनतेच्या प्रश्नासाठी समोर येणारे राजकर्ते व सामाजिक संघटना याकडे लक्ष देणार का ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!