महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरी पै महेंद्र गायकवाडला दिली चांदीची गदा

भूमीपुत्र न्यूज

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पुणे येथे झालेल्या 65 व्या कुस्ती अधिवेशनात 46 व्या महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेसाठी अंतिम लढत शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड या दोन मल्लामध्ये झाली यामध्ये विजयी झालेल्या व महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणाऱ्या पै शिवराज राक्षे या मल्लास चांदीची गदा दिली परंतु सन 2022- 23 च्या 46 व्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरीलाही चांदीची गदा दिल्याने दोन्ही मल्लाचा यथोचित सन्मान झाल्याचे दिसून आले .

पुणे जिल्ह्यातील खेड येथील शिवराज राक्षे याने मॅट वरून अंतिम लढतील प्रवेश केला तर सोलापूरचा मंगळवेढा तालुक्यातील महेंद्र गायकवाड याने माती विभागातून अंतिम लढतीत प्रवेश केला या दोन्ही मल्लांची अंतिम लढत मॅटवर झाली या लढतीत या अंतिम लढतीत शिवराज राक्षे यांनी दुहेरी पट काढत असताना महेंद्र गायकवाड यास चितपट करून महाराष्ट्र केसरी किताब मिळविला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतील चितपट करून महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवण्याच्या काही मोजक्या लढतील ही लढत मानली जाते.

यानंतर महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृषभूषणसिंह, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली तर यावर्षीपासून तहयात उपमहाराष्ट्र केसरी लाही लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी चांदीची गदा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची आज 14 जानेवारी जयंती या जयंती पासूनच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे कर्तृत्ववान सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षीपासून उपमहाराष्ट्र केसरी साठी तहयात दिली जाणारी चांदीची गदा हा एक सुंदर योगायोगच म्हणावा लागेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!