“मी सावरकर” या फेसबुक व व्हाट्सअप स्टेटस वरून भाजप नेते होत आहेत ट्रोल
भूमीपुत्र न्यूज
संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावरून गदारोळ होत असताना भाजप नेत्यांनी त्यांच्या व्हाट्सअप व फेसबुक स्टेटस ला मी सावरकर असं स्टेटस ठेवल्याने समाज माध्यमातून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टीका टिप्पणी होत असून या भाजप नेत्यांना ट्रोल केले जात आहे .
यामध्ये प्रामुख्याने बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षाही आपण सावरकरांना श्रेष्ठ समजत आहात का? असेही खोचक प्रश्न नेटकरी भाजप नेत्यांना विचारत आहेत याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सावरकरांचे स्टेटस ठेवून आपण काय साध्य करू पाहत आहात? असेही नेटकरी भाजप नेत्यांना विचारीत आहेत वरिष्ठांनी आदेश दिल्याने वरिष्ठांचा आदेश शिरसावंद मानून स्टेटस ठेवणारे भाजप नेत्यांनी आपली बुद्धी व अक्कल गहाण तर ठेवली नाही ना? असाही खोचक प्रश्न विचारात आहेत ज्यावेळी माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते यावेळी हे भाजप नेते कुठे गेले होते त्यावेळी त्यांनी आपल्या तोंडाला कुलूप लावले होते का? असाही खोचक सवाल नेटकरी या भाजप नेत्यांना विचारीत आहेत.
यापेक्षाही कितीतरी या ठिकाणी न मांडण्यासारखे लिखाण करून नेटकऱ्यांनी भाजप नेत्यांना ट्रोल केले असून यामुळे भाजप नेत्यांची चांगलीच पंचायत झाल्याची दिसून येत आहे वरिष्ठांचा आदेश असल्याने आपली इच्छा नसूनही आपणास काहीही करता येत नाही अशी गत भाजप नेत्यांची झाली असून धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असाही खोचक सवाल विचारला जात आहे .
भाजप नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फेसबुक व व्हाट्सअप यावर ठेवलेला स्टेटसवर नेटकऱ्यांनी काही चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान व केलेले कार्य याचाही गौरव उद्गार केला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही याचाही उल्लेख यामध्ये केलेला आहे यामुळे दोन्ही बाजू नेटकऱ्यांनी फेसबुक व व्हाट्सअप स्टेटस वर मांडले आहेत