शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर चाकोरे येथे 5 ते 11 जानेवारी दरम्यान होणार
भूमिपुत्र न्यूज
अकलूज येथील शंकराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर 5 जानेवारी ते 11जानेवारी 2023 या कालावधीत माळशिरस तालुक्यातील चाकोरे या ठिकाणी आयोजित केले असल्याची माहिती कार्यक्रमाधिकारी डॉ दत्तात्रय मगर, डॉ सज्जन पवार व डॉ. सविता सातपुते यांनी दिली .
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘युवकांचा ध्यास,ग्राम -शहर विकास’ या उद्देशातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन गुरुवार दि 5 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वा माळशिरसचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे हे आहेत
बुधवार दि 11 जानेवारी 2023 रोजी या शिबिराच्या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत .या शिबिर कालावधीत जलसंधारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, कोरोना जनजागृती, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, आरोग्य विषयक शिबिर, पशुचिकित्सा शिबिर ,ग्राम स्वच्छता अभियान, महिला मेळावा, व्यक्तिमत्व विकास, अंधश्रद्धा निर्मूलन ,व्यसनमुक्ती, आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध समाज प्रबोधनपर तसेच मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिबीर कालात नामवंत वक्ते यांचेही दररोज शिबिरार्थी विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन होणार आहे .या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे व कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे .