महाराष्ट्र नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधकानी पदाचा दुरुपयोग करून शासनाची केली फसवणूक
पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यातील घटना
भूमीपुत्र न्यूज
महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधक छाया लाड यांनी स्वतःच्या फायद्या करिता पालघर जिल्ह्यातील जवाहर या तालुक्याच्या ठिकाणी स्वतःचे पती व मुलाच्या नावाने असणाऱ्या रेणुका बहुउद्देशीय ट्रस्ट द्वारा श्री गजानन महाराज नर्सिंग कॉलेज जी एन एम व ए एन एम अभ्यासक्रमाची परवानगी व प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करण्याकरिता आपल्या पदाचा दुरुपयोग करून बोगस 100 खटांच्या रुग्णालयाला 200 खटांचे रुग्णालय दाखवून शासनाची दिशाभूल करून ए एन एम व जी एन एम अभ्यासक्रमाची मान्यता मिळवली व तपासणी समितीने नियमबाह्य जाऊन संस्थेस शिफारस केली याकरिता पदाचा दुरुपयोग करणाऱ्या प्रबंधक छाया लाड व तपासणी समितीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत शासनाकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारदाराने या तक्रारीत असे म्हटले आहे की प्रबंधक छाया लाड यांचे पती व मुलाच्या नावाने सुरू असणाऱ्या नर्सिंग कॉलेजची जी एन एम व ए एन एम अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 30 असून परवानगी घेणे करिता व प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करण्याकरता तपासणी करून महाराष्ट्र नर्सिंग मंडळांनी सन 2021 ला शिफारस प्रस्ताव पाठवला होता त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण यांच्यामार्फत 2021 ला समिती गठित करण्यात आली या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बी जी चिखलकर ,सचिव पल्लवी लेले ,वैशाली घुगे हे होते या समितीने सदर नर्सिंग कॉलेजची तपासणी केली परंतु भारतीय परिचर्या परिषदेच्या नियमाचे पालन न करता पदाचा दुरुपयोग केला असे अहवालावरून स्पष्ट निदर्शनास येत आहे कारण संस्थेकडे स्वतःचे रुग्णालय नसून तपासणी अहवालानुसार 200 खटांचे रुग्णालय जवाहर येथे दाखविण्यात आले परंतु सदर उपजिल्हा कॉटेज रुग्णालय हे 200 खटांचे नसून फक्त 100 खटांचे आहे तसेच केईएम हॉस्पिटल हे पण रुग्णालय नर्सिंग कॉलेज सोबत अफिलेटेड आहे असे तपासणी अहवालामध्ये दाखविण्यात आले परंतु सदर हॉस्पिटल हे कॉलेज पासून 100 कि मी अंतरावर आहे अशा दोन्ही गंभीर बाबी आहेत.
नियमानुसार अफिलेटेड हॉस्पिटल हे 100 खटांचे असावे व कॉलेज व हॉस्पिटल मधील आंतर जास्तीत जास्त 30 किलोमीटर असणे आवश्यक आहे असा नियम असताना सुद्धा सदर समितीने याकडे दुर्लक्ष केले की ही गंभीर बाब असून 100 खटांचे रुग्णालय 200 खटांचे दाखविण्याबाबत खोटी कागदपत्र संस्थेने बनविली व समितीने माहीत असून सुद्धा त्याला मान्यता चुकीच्या पद्धतीने दिली याचबरोबर सदर संस्थेकडे स्वतःची कॉलेज इमारत व वसतिगृह नाही भाडे करारनामा मध्ये किती जागा उपलब्ध व कोठे याचाही उल्लेख नाही इन्स्पेक्शन फॉर्ममध्ये भरलेली माहिती ही दिलेल्या सूचनानुसार न भरता लाभ पोहोचविण्याकरता भरण्यात आलेली आहे.
सदर संस्था ही मानकात बसत नाही हे लक्षात आल्यावर शासनाकडून 22 /4/ 2021 ला संचालन वैद्यकीय शिक्षण यांना सदर संस्थेची स्वतःची इमारत नाही भाडे करारनामा व्यवस्थित नाही शिक्षक कमी आहेत अशा तीन त्रुटी दाखविल्या असताना सुद्धा कोणत्या आधारावर सदर संस्थेस प्रवेश क्षमता व अभ्यासक्रमाची सुरुवात करण्याकरता परवानगी दिली असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
शासनाने गठीत केलेल्या समितीने प्रबंधक छाया लाड त्यांचे पती व मुलाला फायदा मिळवून देण्याकरता छाया लाड यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे शासनास सादर केली तसेच वैद्यकीय शिक्षण व संपूर्ण वैद्यकीय विभागाची दिशाभूल करून मान्यता प्राप्त करून घेतलेली आहे यामुळे या तपासणी समितीतील सचिवा पल्लवि लेले ,छाया लाड यांच्या अधिपत्याखाली नर्सिंग मंडळामध्ये कार्यरत असलेल्या छाया लाड यांनी स्वतःच्या कॉलेजची तपासणी करण्याकरीता स्वतःच्या जवळच्या लोकांना पाठवून प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करून व परवानगी घेतलेली आहे यामुळे प्रबंधक छाया लाड यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करून लाच लुचपत खात्याकडून त्यांच्या मालमत्तेची तपासणी करण्यात यावी व त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या विषयाचे गंभीर्य लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण विभाग आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे ही निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे आयुक्त हे तीन सदस्य समिती गठीत करून या विषयाची सखोल चौकशी करून शासनाला अहवाल सादर करणार आहेत असेही नमूद करण्यात आले आहे.
याबाबत प्रबंधक छाया लाड यांच्याशी मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास सुमारास संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की ,या प्रकाराबाबत मला काहीही माहित नसून या प्रकाराची मी संपूर्ण माहिती घेऊनच आपल्याला बोलेन.