सिंधुदुर्ग किल्यावर शंकरराव मोहिते महाविद्यालयातील विदयार्थ्यांकडून प्लास्टिकची स्वच्छता मोहिम
भूमीपुत्र न्यूज/केदार लोहकरे
20 , 21 व 22 जानेवारी रोजी शंकरराव मोहिते महाविद्यालय सांस्कृतिक विभाग,राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाची सहल देवगड,विजयदुर्ग व सिंधुदुर्ग अशा ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर गडाची माहिती घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची पदचिन्ह व हाताचा पंजा चिन्ह असलेले बुरूजावर ते महादरवजा व नगारखाना याच्या बुरजावरच्या तटबंदीमध्ये विदयार्थ्यांना जांगिया डागणारया ठिकाणी प्लास्टिक बाटल्यांचा खच खोलवर टाकलेले दिसला ज्यामुळे तटबंदीवर खुप घाण साठलेली दिसत होती.विदयार्थ्यांनी कोणताही विचार न करता सर्वांनी तटबंदीच्या जांगीयामध्ये पडलेल्या बाटल्यांचा खच उपसायला सुरवात केली.जिथे हात पोहचत नव्हते तिथे काटीच्या सहाय्याने प्लास्टिक व कोंल्ड्रिक्सच्या किमान पाचशे ते सातशे बाटल्या व प्लस्टिक कागद व तुकडे विद्यार्थ्यानी गोळा करुन तटबंदीच्या खाली आणुन ते कचरा कुंडीमध्ये टाकले.
महाविद्यालयीन विदयार्थी व आजच्या तरूणाई कडे निराशावादी वृत्तीने पहात असताना केवळ मनोरंजन मजा करण्यासाठीच नाही तर आवाज दिला तर कोणतेही आव्हान पेलण्यासाठी तरुणाई सज्ज होते हि सकारात्मकता या गोष्टीतून दिसुन आली.सहलीचे नियोजन केवळ मनोरंजनासाठीच नाही तर सामाजिक जाणिवाही प्रगल्भ झालेल्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कृतीतून पाहावयास मिळाल्या यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे