उदय दत्तात्रय देशमुख यांचे निधन

भूमीपुत्र न्यूज
स्मृतीशेष उदय दत्तात्रय देशमुख रा. देशमुख वस्ती, अकलूज यांचे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 53 वर्ष इतके होते .
स्मृतीशेष उदय देशमुख हे एसटी महामंडळात अकलूज येथे आगार लिपिक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांना सांगोला आगार येथे लेखाकार म्हणून बढती मिळाली होती. स्मृतीशेष देशमुख हे माळशिरस तालुक्यात मराठा सेवा संघ स्थापन झाल्यापासून तालुका कार्यकारणीत सक्रिय कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. पत्नी शिवमती निता देशमुख ह्या माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेड मध्ये सक्रिय कार्यकर्त्या आहेत.देशमुख कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार यांना दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो ही जिजाऊ चरणी प्रार्थना.
तिसरा सवडणेचा कार्यक्रम रविवार दी.23/7/2023 रोजी अकलाई घाट ,अकलूज येथे सकाळी 7.30 वाजता आहे.
माळशिरस तालुका मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड आदी सर्व 32 कक्षांच्या वतीने भावपूर्ण शिवांजली 💐💐




