सोनू पराडे पाटील मित्र मंडळाच्या वतीने बाभूळगाव येथे अनोखा सार्वजनिक वाढदिवस साजरा

भूमीपुत्र न्यूज
बाभूळगाव ता माळशिरस येथील युवा नेतृत्व सोनू पराडे पाटील मित्र मंडळाच्या वतीने 1 जून रोजी बाभूळगाव व परिसरातील ज्यांचा वाढदिवस आहे अशा सर्वांचा सार्वजनिक वाढदिवस बाभुळगाव ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते सोनू पराडे पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष जयकुमार केचे पाटील ,मराठा सेवा संघाचे निनाद पाटील ,भूषण पाटील, विकी पराडे, जयेश पराडे ,शंकर पराडे,रोशन मस्के,राज चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लालासाहेब पराडे ,ह भ प सुग्रीव मिटकल, चंद्रकांत पराडे तंटामुक्ती अध्यक्ष, विष्णू पराडे गुरुजी,देविदास पराडे,राहुल चव्हाण,पांडुरंग मिटकल, चंद्रकांत पराडे, शहाजी पराडे, पोपट पवार,नानासाहेब पवार,बाळासाहेब माने,गणेश गोडसे, विजय पवार , पंजाबराव क्षीरसागर उमाजी माने, हनुमंत क्षीरसागर, नाना पराडे, तुकाराम कचरे, प्रभाकर सूर्यवंशी, नंदेश पराडे, रवी जाधव. या सर्वांना वाढदिवसानिमित्त मानाचा फेटा व पुष्पहार घालून निरोगी व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

या आगळ्यावेगळ्या अशा सार्वजनिक वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना युवा नेते सोनू पराडे पाटील म्हणाले की, अलीकडच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात वेळेची बंधने सर्वांवरच आहे मात्र आपापसातील प्रेम व स्नेहभाव जपण्यासाठी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे यासाठी ज्यांचा आज वाढदिवस आहे त्या सर्वांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी बोलताना मिटकल गुरुजी यांनी अनेक दाखले देत तरुणांनी निरोगी व निर्व्यसनी राहावे असा सल्ला दिला तर ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांनाच अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष जयकुमार केचे पाटील व मराठा सेवा संघाचे निनाद पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.





