महाराष्ट्रमाळशिरस तालुकाराजकीय

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीवर 17 जागा जिंकून पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते पाटील यांचेच वर्चस्व

विरोधकांना केवळ 1 जागा

भूमीपुत्र न्यूज

अतिशय चुरशीची समजली जाणारी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होईल असे वाटत असताना विजयसिंह मोहिते पाटील पॅनल ने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 17 जागा जिंकून विरोधी शेतकरी विकास आघाडी पॅनलचा धुव्वा उडविला आहे माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलचे उमेदवार व राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे विरोधी गटातील एकमेव उमेदवार निवडून आले आहेत.

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे सर्व विरोधक एकत्र आल्याने सत्ताधारी मोहिते पाटील यांना काटे की टक्कर देतील असे वाटत होते परंतु शनिवार दि 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वा मतमोजणीस सुरुवात झाली सुरुवातीस सहकारी संस्था अ सर्वसाधारण मतदार संघातील मतमोजणी सुरुवात झाली होती परंतु या विभागातील 7 ही जागा विजयसिंह मोहिते पाटील पॅनलने निर्विवाद जिंकत माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीचा पराभव केला यामध्ये बाबुराव शंकरराव कदम 1020, शिवाजी चंद्रकांत चव्हाण 1016, लक्ष्मण आगतराव पवार यांना 1003 ,बाळासो गुलाबराव माने देशमुख 1017, मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांना 1043, मारोतराव नाथा रूपणवर यांना 1009, नितीन अशोक सावंत यांना 995 असे मतदान मिळाले .

तर याच विभागातून गणेश भजनदास इंगळे 636, नागेश रघुनाथ काकडे 636, जानकर उत्तम शिवदास 678, पांडुरंग किसन पिसे 633, दादासाहेब अरुण लाटे 620 ,पांडुरंग तुळशीराम वाघमोडे 633, बाळासाहेब बंकट सावंत 608, तर याच विभागातील एकूण 98 मते बाद झाले सहकारी संस्था क इतर मागासवर्गीय मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील पॅनल कडून भानुदास यशवंत राऊत यांना 1060 तर भीमराव सदाशिव फुले यांना 682 एवढे मतदान झाले तर यातील 30 मते बाद झाली सहकारी संस्था व महिला राखीव मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील पॅनलच्या उमेदवार मेघा सचिन साळुंखे यांना 1045 तर अमृता सुधीर सुरवसे यांना 1020 तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या उमेदवार पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांना 699 तर सोनाली राजेंद्र पाटील यांना 678 एवढे मतदान झाले या विभागातील 32 मते बाद झाले तर सहकारी संस्था ड विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार संदीप शामदत्त पाटील यांना 1076 तर अजित भरत बोरकर यांना 661 मते मिळाली या विभागातील 35 मते बाद झाली.

ग्रामपंचायत विभागातून सर्वसाधारण मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार शहाजीराव मुधोजीराव देशमुख यांना 595 तर बापूराव नारायण पांढरे यांना 551 एवढे मतदान झाले तर याच विभागातून माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलचे उमेदवार के के पाटील यांना 481 तर पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांना 407 एवढे मतदान मिळाले या विभागात 57 मते बाद झाली ग्रामपंचायत मतदार संघ क आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या मधून विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार पोपट रंगनाथ भोसले यांना 585 तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार यशवंतराव बाळासाहेब घाडगे यांना 491 तर याच विभागातील 56 मते बाद झाली.ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलचे उमेदवार उत्तम शिवदास जानकर यांना 554 तर विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार दत्तूराम हरिदास लोखंडे यांना 524 मतदान झाले तर या विभागातील 54 मते बाद झाली

.हमाल व तोलार मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार उद्धव निवृत्ती डांगरे यांना 144 तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलचे उमेदवार संजय युवराज कोळेकर यांना 5 मते मिळाली तर या विभागातील 39 मते बाद झाली व्यापारी मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार महावीर मगनलाल गांधी यांना 319 व आनंद अशोक फडे यांना 315 तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलचे उमेदवार दीपक महादेव गरड यांना 92 तर मोहसीन शमशुद्दीन बागवान यांना 19 इतके मतदान झाले आहे तर या विभागातील 33 इतकी मते बाद झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!