निमगाव येथील ज्ञानेश्वर मदने या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
भूमीपुत्र न्यूज
निमगाव ता माळशिरस येथील निमगाव- पिलीव रोड नजीक (65 फाट्याजवळ) राहणारा ज्ञानेश्वर उर्फ माऊली आप्पासो मदने वय 22 वर्ष याने निमगाव येथील आपल्या राहते घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने स्वतः गळफास घेऊन शनिवार दि 13/5/23 रोजी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली.
निमगाव येथील आपले राहते घरी पत्र्याचे लोखंडी अँगला नायलॉनच्या दोरीने स्वतः गळफास घेतल्याचे त्याचे आईस दिनांक 13 /5/ 2023 रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास दिसून आल्याने घटनास्थळी वेळापूर पोलीस स्टेशनचे पीएसआय संजय राऊत व पोलीस हवालदार जनार्दन करे यांनी येऊन सदर मयताचा पंचनामा केला वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर मयताचे शवविच्छेदन करण्यात आले शनिवार दि 13 मे रोजी रात्री उशिरा ज्ञानेश्वर उर्फ माऊली मदने याच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात आला सदर घटनेचा तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जनार्दन करे हे करीत आहेत .