महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

अकलूज येथील सहारा इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

भूमीपुत्र न्यूज

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या विशेष कार्यक्रमाचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने उद्या, रविवारी (दि. २२) सकाळी १०:४५ वाजता माळेवाडी कॉलेज रोडवरील सहारा इन्स्टिट्यूटच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशाला मिळणारी दिशा आणि विकासाचा रोडमॅप सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने डॉ. राहुल जवंजाळ यांनी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य पातळीवरील विविध विषयांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.

उद्या रविवारी सकाळी १०:४५ वाजता सहारा इन्स्टिट्यूट येथे हा सोहळा संपन्न होईल. या ऐतिहासिक संवादाचा साक्षीदार होण्यासाठी अकलूज शहर आणि परिसरातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकलूज मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे,भाजपा शहर अध्यक्ष महादेवजी कावळे, मंडल सरचिटणीस अमित टिळेकर आणि ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष किसन शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!