माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा
माळशिरस तालुका सकल मराठा समाजाची सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक
भूमीपुत्र न्यूज
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण दौऱ्या संदर्भात विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी याचबरोबर 19 फेब्रुवारी 2026 रोजी बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व मराठा समाजातील कुणबी दाखल्याच्या संदर्भात ज्यांना प्रशासकीय पातळीवर अडचणी निर्माण होत आहेत या संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्याकरीता सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता अकलूज शासकीय विश्रामगृह येथे माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे या बैठकीसाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.




