महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

अकलूज नवीन बस स्थानकात स्फोटके, बॉम्ब शोधक पथकास केले पाचारण, अकलूज पोलिसांची कारवाई

भूमीपुत्र न्यूज

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ज्याची ओळख होती त्या अकलूज मधील नवीन बस स्थानकात गुरुवार दिनांक 19 जून रोजी बेवारस बागेमध्ये स्फोटके व बेवारस वस्तू असल्याची माहिती अकलूज पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ सगळ्या यंत्रणा कार्यान्वित झाल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम अकलूज शहरात असतो आणि याच पालखीच्या मुक्कामापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अकलूज च्या नवीन बस स्थानकात स्फोटके असल्याची माहिती मिळाल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्यू आर टी पथक, आर सी सी पथक, फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, सुरक्षा शाखा, वाहतूक शाखा यांना पाचारण करून अकलूज नवीन बस स्थानक येथे बेवारस बॅगेमध्ये स्फोटके आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या बाबत अकलूज पोलिसांनी गुरुवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 11 ते 12.30 वा दरम्यान डेमोसेशन करण्यात आले .

अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने आषाढी वारीच्या अनुषंगाने अकलूज येथील नवीन बस स्थानकात मॉकड्रिल, रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोसई हनुमंत जरे ,महिला पोसई करिष्मा वणवे पोलीस स्टॉफ, अकलूज पोलीस ठाणे तसेच सर्व पथकातील कर्मचारी ,अधिकारी उपस्थित होते मात्र या रंगीत तालमीच्या वेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे जाणवून आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!