सुमित्रा पाणी वापर संस्थेला जलसंपदा विभागाकडून मिळाले नोंदणी प्रमाणपत्र

भूमीपुत्र न्यूज
निमगाव ता माळशिरस येथील सुमित्रा पाणी वापर संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग ,पुणे पाटबंधारे मंडळ पुणे ,निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे सुमित्रा पाणी वापर संस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली असून जवळपास 648 हेक्टर क्षेत्र या पाणी वापर संस्थेअंतर्गत ओलिताखाली येते .
नीरा उजवा कालव्यावरील वितरिका क्रमांक 65 वरील विमोचन क्रमांक 7व 8 वरील सुमित्रा पाणी वापर संस्था निमगाव ता माळशिरस जि सोलापूर ही पाणी वापर संस्था स्थापन झाली असून सदर पाणी वापर संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील नियम 5 नुसार करण्यात आली आहे सदर पाणी वापर संस्थेचा नोंदणी क्रमांक 162/277 सन 2021- 22 दि 9/ 5/ 2022 असा आहे असे या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे लवकरच या संस्थेच्या चेअरमन व सचिव यांची निवड प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सदर प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली आहे .





