निधन वार्तामाळशिरस तालुका

नवनाथ आप्पांची अचानक एक्झिट शॉकिंग न्यूज…नवनाथ उर्फ पुरुषोत्तम बाळासाहेब मगर यांचे निधन

भूमीपुत्र न्यूज

नवनाथ उर्फ पुरुषोत्तम (नवनाथ आप्पा) बाळासाहेब मगर यांचे मंगळवार दि 21 जानेवारी रोजी दुपारी 2.00 वा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले आपल्याला त्रास होत आहे असे जाणविल्यानंतर ते निमगाव येथून आपले बंधू डॉ.चंद्रकांत मगर पंढरपूर यांच्याकडे उपचारासाठी गेले असता उपचारादरम्यानात त्यांचे आकस्मित निधन झाले. कृषीभूषण पुरस्कार प्राप्त व प्रयोगशील शेतकरी, संयमी, शांत व मनमिळावू स्वभावाचे नवनाथ आप्पा यांची अचानक झालेली एक्झिट ही मनाला चटका लावून देणारी घटना आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुली 1 मुलगा असा परिवार आहे भूलतज्ञ डॉ. चंद्रकांत बाळासाहेब मगर यांचे ते बंधू होते त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घराशेजारी सायंकाळी 6.30 वा केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!