अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयास किकबाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
भूमीपुत्र न्यूज
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ऋषीकेश भागवत भाकरे याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून किकबाॅक्सींग स्पर्धेत ७५ किलो वजन गटात ६ फाईट खेळून सुवर्णपदक पटकावले.यानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धा १३ ते १७ मार्च रोजी वीर बहादुरसिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटी जौनपुर उत्तर प्रदेश येथे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी किकबाॅक्सिंग चॅम्पियन आयोजित करण्यात आल्या होत्या.या किकबाॅक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत ६५ विद्यापीठातील ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. रत्नाई कृषी महाविद्यालयातील खेळाडू ऋषीकेश भाकरे याने किकबाॅक्सिंग चॅम्पियन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक संपादन केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शन संचालक जयसिंह मोहिते-पाटील,,स्वरूपाराणी मोहिते -पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
बुधवार दि 29 मार्च रोजी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ऋषीकेश भाकरे याचा फेटा, शाल,हार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य राजाभाऊ लव्हाळे,विनोद दोशी,तात्या एकतपुरे,नारायण फुले,सुभाष दळवी,वसंतराव जाधव,रामभाऊ गायकवाड,उत्कर्ष शेटे,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,प्रा.रवी नलवडे,प्रा.रणजीतसिंह निंबाळकर,प्रा.निलेश माने देशमुख,मार्गदर्शन क्रिडा शिक्षक प्रा.प्रदिप पांढरे,प्रा.दिनेश जाधव,प्रा.संतोष आडत उपस्थित होते.