मुलगा सरपंच व्हावा “ही आजीची इच्छा” 101 वर्षाच्या आजीने केले मतदान

भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील संगम या गावच्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत जवळपास 88.35% एवढ्या मतदारानी मतदानाचा हक्क बजाविला भैरवनाथ विकास पॅनल व सहकार महर्षी ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून दोन्ही गट एकमेकांना सामोरे जात आहेत.

9 सदस्य संख्या व 1949 एकूण मतदार असलेल्या संगम ग्रामपंचायत साठी सरपंच पद हे खुल्या गटासाठी असल्याने सरपंच पदासाठी भैरवनाथ विकास पॅनल च्या माध्यमातून लालासाहेब पराडे तर सहकार महर्षी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार नारायण भगवानराव ताटे यांच्यात तुल्यबळ लढत होत असून सरपंच कोण होणार ? याकडे संपूर्ण संगम गावासह तालुक्याचे लक्ष लागलेले आहे या लक्षवेधी लढतीत आपलाच मुलगा सरपंच व्हावा म्हणून सहकार महर्षी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार नारायण ताटे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भगवानराव ताटे वय वर्ष 101यांनी मतदान केले यामुळे मुलगा सरपंच व्हावा ही आजीची इच्छा अशी पोस्ट समाज माध्यमावर दिवसभर फिरत होती .




