विझोरी येथे चोरी दीड लाखाच्या रकमेसह तीन तोळे सोने घेऊन स्प्लेंडर गाडीसह चोरटे झाले पसार

भूमीपुत्र न्यूज
विझोरी ता माळशिरस येथील सुदाम तुळशीराम शेंडगे यांच्या घरी मंगळवार दिनांक 24 जानेवारीच्या पहाटे 3 वा च्या सुमारास घर फोडी करून चोरट्यानी 1लाख 53 हजाराच्या रोख रकमेसह 3 तोळे सोने व हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी घेऊन चोरटे पसार झाले असल्याची माहिती सुदाम तुळशीराम शेंडगे यांनी भूमीपुत्र न्यूज सी बोलताना दिली

सुदाम शेंडगे व त्यांचे कुटुंबीय एका खोलीत झोपले असताना त्यांच्या खोलीची बाहेरून कडी लावून चोरट्याने दुसऱ्या खोलीतील रोख रकमेसह सोन्याचा ऐवज घेऊन गाडीसह पोबारा केला आहे या अगोदर चोरट्याने अनिल यलापा शिंदे यांच्या घरीही घरपोडी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्या ठिकाणी काहीही सापडले नाही यानंतर चोरट्यानी अशोक यशवंत काळे यांच्या घरातील कपाट फोडून 500 रुपये चोरी केले तर घर फोडीची हत्यारे चोरट्यानी अशोक काळे यांच्या घराशेजारी टाकून पोबारा केला आहे .

चोरी झाल्याच्या घटनेनंतर पहाटे पाचच्या सुमारास सुदाम शेंडगे यांचे चिरंजीव डॉ सचिन शेंडगे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी अकलूज पोलीस स्टेशनला याबाबत कळवले असून सकाळी अकलूज पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील घटनेचा तपास करीत आहेत या चोरीमुळे विझोरी आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी तात्काळ चोरट्यांना अटक करून तपास लावावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत




