माळशिरस तालुका

अकलूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी(डी.वाय.एस.पी) पदी सई भोरे -पाटील

भूमीपुत्र न्यूज

अकलूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी(डी वाय एस पी) पदी तुळजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सई प्रताप भोरे -पाटील यांची नेमणूक झाली असून अकलूज चे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांची नुकतीच श्रीरामपूर,नगर येथे बदली झाल्याने अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार तुळजापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदी कार्यरत असलेल्या सई प्रताप भोरे पाटील यांची अकलूज येथे नेमणूक झाली आहे .

अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची श्रीरामपूर, नगर येथे बदली झाली होती यामुळे अकलूज येथील रिक्त झालेल्या डीवायएसपी पदी तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई प्रताप भोरे पाटील यांची नेमणूक झाली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!