Uncategorized

रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी वाघोलीचे पंडित मिसाळ

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी वाघोली गावचे उपसरपंच पंडित विठ्ठल मिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माढा लोकसभेचे खा धैयशील मोहिते पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला.

या निवडी बद्दल माढा लोकसभेचे खा धैर्यशील मोहिते पाटील, वाघोली ग्रामपंचायतचे सरपंच अमोल मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य व युवक नेते योगेश माने शेंडगे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय मिसाळ, बीज उत्पादक संस्थेचे सचिव दिलीप शिरसट,मराठा सेवा संघाचे उत्तम शेंडगे ,तुषार पाटोळे, वाफेगावचे उपसरपंच कुंडलिक गायकवाड, बाभुळगाव चे युवक नेते विनायक पराडे पाटील, माजी उपसरपंच कालिदास मिसाळ, सोसायटीचे मा चेअरमन अशोक चव्हाण, अमोल मिसाळ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या .

यावेळी उद्योजक गणेश मिसाळ, बाळासाहेब मिसाळ, सुनील चव्हाण,चंद्रकांत मिसाळ, वैभव मिसाळ आदित्य मिसाळ कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!