अकलूजमध्ये नगरसेवक महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; २३२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भूमीपुत्र न्यूज
भाजपा नगरसेवक तथा मैत्री फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल २३२ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदात्यांच्या या मोठ्या प्रतिसादामुळे समाजसेवेवरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.मैत्री फाऊंडेशनच्या वतीने सलग सातव्या वर्षी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात विधिज्ञ ॲड. उदय कांबळे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून केली.

“गेल्या सात वर्षांत मैत्री फाऊंडेशनच्या माध्यमातून शेकडो गरजू रुग्णांना वेळोवेळी रक्त उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य करण्यात आले आहे. जात, धर्म, पंथ किंवा कोणताही भेदभाव न करता केवळ ‘माणुसकी’ हाच धर्म मानून गरजूंना मदत करण्याच्या फाऊंडेशनच्या भूमिकेमुळे नागरिकांचा या उपक्रमावर विश्वास दृढ होत आहे. याच विश्वासामुळे दरवर्षी रक्तदात्यांची संख्या मोठी राहत आहे.”गेल्या ७ वर्षांतील रक्तदानाचा उल्लेखनीय आलेखमैत्री फाऊंडेशनने दरवर्षी रक्तदानाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
गेल्या सात वर्षांतील रक्तदात्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच अकलूजकरांनी नगरसेवक महेश शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मैत्री फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी शिबिराचे नेटके नियोजन केले होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे यावेळी मैत्री फाऊंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच समाजाने दाखविलेले हे प्रेम आणि विश्वास पुढेही सामाजिक कार्याची ऊर्जा देत राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.




