माळशिरस तालुकाशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न बनावे / पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर

भूमीपुत्र न्यूज

रत्नाई संकुल,अकलूज येथे ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय,अकलूज,जिजामाता कन्या प्रशाला,अकलूज व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील महिला वसतिगृह अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले.

राष्ट्रगीत, ध्वजगीतानंतर घोषपथकाच्या तालासुरात आरएसपी व गाईडच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन करून संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायतीचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये , देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या बहारदार कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे सुगावकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखावेत व स्पर्धेच्या युगात अव्वल राहण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.

याप्रसंगी अकलूज पोलीस स्टेशनचे चौधरी,पिंगळे,आगलावे व खटमोडे,प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख,महिला वसतिगृह अधीक्षीका अनिता निंबाळकर उपस्थित होते. स्थानिक प्रशाला समितीच्या सदस्या नयना शहा,हेमलता चांडोले,मनीषा चव्हाण पत्रकार अनिल बडे उपस्थित होते.


प्रास्ताविक मुख्याध्यापक कलाप्पा सुर्यवंशी यांनी केले तर दिग्विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!