माळशिरस तालुकाशैक्षणिक

प्रा.रवींद्र माने यांना पीएचडी प्रदान

भूमीपुत्र न्यूज

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर येथील मानसशास्त्र विभागातील प्रा. रवींद्र माने यांना “बागायत व जिरायत शेतकऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व व जीवन समाधानाचा अभ्यास” या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली.

डॉ.रवींद्र माने यांना शिवाजी आर्टस् कॉमर्स व सायन्स कॉलेज कन्नड,जि.संभाजीनगरचे डॉ.आर एम.घोती हे मार्गदर्शक म्हणून लाभले.शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक विजयसिंह मोहिते-पाटील,जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे व इतर मान्यवरांनी डॉ.रवींद्र माने यांचे अभिनंदन केले.


त्यांच्या या यशाबद्दल अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोज नांगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्रा.दादा साठे,डॉ.बिटू मोलाणे-भोसले,प्रा.आशा गायकवाड,प्रा.पाडुरंग भोसले, प्रा.अभिजीत घाडगे,प्रा.गोरख मंगवडे,प्रा.नानासाहेब वरकड, प्रा.उर्मिला कोडग,प्रा.संजय पाटील,प्रा.राहुल चव्हाण,ग्रंथपाल डॉ.वैशाली मोरे,राजेंद्र बामने, रविंद्र साळुंखे इ.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!