मा आ राम सातपुते यांची वेळापूर शेरी येथील अमृतराज सूर्यकांत माने देशमुख यांच्या निवासस्थानी भेट

अभयसिंह सूर्यकांत माने देशमुख यांचा सेक्रेटरी पदाचा राजीनामा
भूमीपुत्र न्यूज
स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर अकलूज या कारखान्याचे सेक्रेटरी अभयसिंह सूर्यकांत माने देशमुख यांनी 22 मे रोजी आपल्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा कारखान्याचे चेअरमन यांच्या नावाने कारखाना कार्यालयाकडे सुपूर्द केला.अभयसिंह माने देशमुख यांनी आपल्या सेक्रेटरी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने त्यांच्या राजीनाम्याचा विषय सर्वत्र चर्चेचा विषय होत आहे.
अभयसिंह माने देशमुख हे माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते सूर्यकांत(दादा) माने देशमुख यांचे चिरंजीव असून माने देशमुख हे मोहिते पाटील यांच्या घरातील घर आहे मागील दोन दिवसांपूर्वी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी वेळापूर शेरी येथील अमृतराज माने देशमुख ,अमरसिंह माने देशमुख व अभयसिंह माने देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली असून अभयसिंह माने देशमुख यांचा तडकाफडकी झालेला राजीनामा याकडे विविध अंगाने पाहिले जात आहे.

अभयसिंह माने देशमुख यांनी कारखान्याच्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिल्याने व नुकतीच माजी आमदार राम सातपुते यांनी वेळापूर शेरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुमारे दोन तास चर्चा केल्याने वेळापूर येथे मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मुळातच अकलूजकर व वेळापूरकर यांची झालेली युती अनेकांना मान्य नव्हती परंतु नाईलाजाने वेळापूर शेरी येथील माने देशमुख कुटुंबीयांना काम करावे लागत होते अशी चर्चा होती .आज ना उद्या हे होणारच होते .मात्र ते घरातूनच होईल असे कोणाला वाटत नव्हते त्याच अनुषंगाने वेळापूर येथील माने देशमुख कुटुंबियांनी भविष्यात आपली वेगळी राजकीय चूल माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मांडली तर नवल वाटायला नको अशीही चर्चा राजकीय जाणकारातून होत आहे.

अभ्यासू ,अनुभवी व हुशार व्यक्तिमत्व म्हणून अभयसिंह सूर्यकांत माने देशमुख सर्वदूर परिचित आहेत स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सेक्रेटरी पदावर काम करीत असताना त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून कारखान्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते व घेत होते अमृतराज, अमरसिंह व अभयसिंह हे तीनही बंधू आपले वडील लोकनेते कै सूर्यकांत(दादा) माने देशमुख यांच्या विकासाच्या विचारांवर पाऊल ठेवून मार्गक्रम करीत होते व लोकनेते सूर्यकांत(दादा) माने देशमुख यांचा सामाजिक राजकीय वारसा सातत्याने जपण्याचा प्रयत्न करीत होते विरोधासाठी विरोध न करता समाज हिताचे अनेक निर्णय माने देशमुख कुटुंबीयांनी आज पर्यंत घेतले होते. परंतु वेळापूर व अकलूजची झालेली युती ही समाज हिताची नाही हे त्यांचे ठाम मत होते अशी चर्चा असल्याने व त्यानुसार अभयसिंह माने देशमुख यांचा सेक्रेटरी पदाचा राजीनामा व माजी आमदार राम सातपुते यांचे व माने देशमुख कुटुंबियांची भेट व चर्चा याकडे वेगळ्या अंगाने पाहिले जात आहे.




