माळशिरस तालुकाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

​अकलूज :पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळेत घुमला चिमुकल्यांचा किलबिलाट; उत्साहात पार पडला ‘शाळा प्रवेशोत्सव’!​

भूमीपुत्र न्यूज

दिर्घ सुट्ट्यांनंतर सोमवारी नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ ला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलींची शाळा क्र. २ व मुलांची शाळा क्र. १) येथे विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.

यंदाचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.​या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृती सातपुते यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या मुख्य उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबवण्यात आला.

शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे डोळे कौतुकाने चमकत होते. या सर्व नव्या आणि जुन्या विद्यार्थ्यांचे स्वागत सभापती संस्कृती सातपुते यांच्या हस्ते नवीन दप्तर, पाठ्यपुस्तके आणि तोंड गोड करण्यासाठी चॉकलेट देऊन करण्यात आले.​ समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी उज्ज्वल शैक्षणिक प्रवासासाठी आणि भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.​​

या कार्यक्रमाला रघुनाथ पांढरे साहेब (गट विकास अधिकारी, माळशिरस)​श्रीमती सुषमा महामुनी (गटशिक्षणाधिकारी)​श्री. महादेव कावळे (भाजपा अकलूज शहराध्यक्ष)​यांच्यासह अकलूजमधील आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.​​

पहिल्याच दिवशी शाळेत मिळालेले आपुलकीचे स्वागत आणि प्रशासनाकडून मिळालेले शैक्षणिक साहित्य पाहून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शिक्षकांनीही आकर्षक सजावट करून संपूर्ण शाळा परिसर बोलका केला होता, ज्यामुळे पहिल्याच दिवशी मुलांचा शाळेतील रस अधिक वाढल्याचे दिसून आले.​

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. आजच्या लहान मुलांमध्येच देशाचे भविष्य दडले असून, त्यांचा उत्साह वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

“सौ.संस्कृती सातपुते (सभापती, सोलापूर जि. प. समाज कल्याण)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!