कोळेगांव ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026;मंगळवारी मतदान;प्रशासकीय यंत्रणा सज्ज

भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली असून उद्या मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे.यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय एकतपुरे यांनी दिली.

कोळेगांव ता माळशिरस येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी दोन गटात लढत होत असून जय बिरोबा ग्राम विकास युती पॅनलच्या अधिकृत उमेदवार सुषमा धनंजय दुपडे यांच्या विरोधात जय बिरोबा ग्राम समृद्धी पॅनलच्या उमेदवार सुनिता अरुण सावंत यांच्यामध्ये लढत होत आहे तर वार्ड क्रमांक दोन मध्ये सदस्य पदासाठी लागलेल्या पोटनिवडणूक साठी ओमराजे किशोर सावंत विरुद्ध सिद्धनाथ मनोहर दुपडे यांच्यामध्ये लढत होत आहे.
मतदानासाठी
प्रभाग क्रमांक 1: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेगांव, पुर्वेकडून पत्र्याची खोली नं. 1 कोळेगाव
प्रभाग क्रमांक 2: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेगांव, पुर्वेकडून पत्र्याची खोली नं. 2 कोळेगाव
प्रभाग क्रमांक 3: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेगांव, पुर्वेकडून पत्र्याची खोली नं. 3 कोळेगाव
प्रभाग क्रमांक 4: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेगांव, पश्चिमेकडून पत्र्याची खोली नं. 2 कोळेगाव
प्रभाग क्रमांक 5: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेगांव, पश्चिमेकडून पत्र्याची खोली नं.1 कोळेगाव
अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय एकतपुरे,ग्राममहसूल अधिकारी ज्योत्स्ना लोखंडे यांनी दिली.




