श्रीजीत जाधव चे यश …अन ॲड एम एम मगर यांची कौतुकाची थाप

भूमीपुत्र न्यूज
निमगाव म येथील जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बबनराव जाधव यांचे नातू व निमगाव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज निमगाव चे शिक्षक धनाजीराव जाधव यांचे चिरंजीव श्रीजीत जाधव याने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत वेळापूर केंद्रात प्रथम क्रमांक , सेमी माध्यम विज्ञान व तंत्रज्ञान विषयात केंद्रात प्रथम येऊन 94.60% गुण मिळविले याबद्दल त्याचा सत्कार आपला युवक शेतकरी फोरम चे संस्थापक अध्यक्ष ॲड एम एम मगर व चित्रलेखा मगर यांच्या हस्ते करण्यात आला .

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निमगाव विद्यामंदिर व जुनिअर कॉलेजचा विद्यार्थी श्रीजीत धनाजीराव जाधव याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष ,सचिवा सर्व संचालक मंडळ व निमगाव विद्यामंदिर निमगाव & ज्युनि. कॉलेज तसेच आदर्श प्राथमिक विद्यालय निमगाव च्या वतीने त्याला यापूर्वीही शुभेच्छा दिल्या आहेत .

निमगाव गावच्या व शाळेच्या दृष्टीने श्रीजीत चे यश ही अभिमानाची गोष्ट आहे. वेळापूर केंद्रात 800 विद्यार्थ्यातून पहिला येणारा तो एकमेव विद्यार्थी आहे. आपल्या शाळेचा व गावाचा विद्यार्थी पहिल्या क्रमांकात यावा अशी आशा बाळगून असणारे बबन जाधव सर व प्रसिद्ध लेखक हनुमंत पवार सर यांचे मार्गदर्शन श्रीजीत या लाभले त्यास पुढील शिक्षणासाठी व उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी आपला युवक शेतकरी फोरम सर्वतोपरी सहकार्य करेल.
ॲड एम एम मगर ,संस्थापक अध्यक्ष आपला शेतकरी फोरम महाराष्ट्र राज्य




